लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करण्यामागे वेगवेगळी करणे सांगितली जातात. विजयादशमीला रावणाचा वध करून श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येत पोहोचले. श्रीरामाचा मोठ्या थाटात राज्याभिषेक झाला. तेव्हा अयोध्यावासियांनी आनंदात सर्व नगर आणि शहर दिवे, फुले आणि रांगोळ्यांनी सजवुन उत्सव साजरा केला. रामरक्षा स्तोत्र पठनाचे महत्व वाचा तेव्हापासून वाईट वृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय म्हणुन दिवाळी साजरी करण्याची पद्धत पडली. रामाने अयोध्येत गेल्यावर, राज्याभिषेक झाल्यावर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. अयोध्येच्या राज्यामध्ये, राज्यकारभारामध्ये गणपतीच्या कृपेने सुबुद्धी यावी आणि लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी यावी यासाठी. रामाचेच अनुकरण करत सामान्य जणांनी हीच पद्धत पुढे चालु ठेवली. दिवाळी पासुन व्यापारी वर्ग आपले नवे वर्ष सुरु करतात. नव्या चोपड्यांची (हिशोब आणि कारभाराच्या वह्या) पूजा करून त्यात नव्या वर्षाचे व्यवहार सुरु करतात. तेही गणपतीने ज्ञान आणि सुबुद्धी द्यावी आणि लक्ष्मीने नवीन वर्षात आणखी समृद्धी द्यावी यासाठी अशी पूजा करतात. हीच पद्धत बाकी वर्गात सुद्धा रूढ झाली. गणपती हा प्