घोड्याचा खरा मालक कोण ?
घोड्याचा खरा मालक कोण ? अकबर बिरबल घोड्याचा खरा मालक कोण ? अकबर बिरबल या गोष्टीची व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. घोड्याचा खरा मालक कोण ? कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता. कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले. बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले. तो म्हणाला “हुजूर, हा घोडा माझा आहे. मी माझ्या गावातुन घोड्यावर बसुन दिल्लीत कामासाठी निघालो होतो. हा माणुस मला रस्त्यात भेटला. तो लंगडत चालत होता. त्याने मला विनंती केली कि मलासुद्धा दिल्लीत यायचे आहे. तुम्हीही तिकडेच जात आहात तर कृपया आपल्या घोड्यावर मला पण घेऊन चला. आता फारसं अंतर उरलं नव्हतं म्हणुन मी त्याला आपल्या घोड्यावर घेतलं आणि निघालो. पण नंतर हा बदमाश माणुस घोडा माझा आहे आणि तू घोड्याला सोडुन निघ म्हणायला लागला. म्हणुन आमचं भांडण सुरु झालं.”...