मुंगी आणि टोळ ( आळशी व कष्टाळू )
मुंगी आणि टोळ ( आळशी व कष्टाळू )
लेखक :- यशराज
मुंगी आणि टोळ ( आळशी व कष्टाळू )
आपण या गोष्टींमध्ये आळशी टोळ आणि कष्टाळू मुंग्यांच्या बद्दल गोष्ट मराठी आहे छान गोष्ट आहे .
एका जंगलामध्ये उन्हाळ्यात मुंगी आपल्या वारुळात जंगलामधून छोटे छोटे अन्न घेऊन येत असे व त्याचा साठा करीत असे जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्याला उपासमार येऊ नये म्हणून असे मुंगीचे दररोज अन्नाचे तुकडे घेऊन येणे आणि वारुळात साठवणे चालू होते.
तर तिकडे आळशी टोळ हा गाणे गाईत नाचत असे त्यावेळी मुंगी टोळाला म्हणाली,
"अरे टोळदादा तू आता कशाला नाचत आहेस पावसाळ्यामध्ये उपासमार येऊ शकते त्यामुळे जरा दररोज थोडं थोडं अन्नधान्य साठवून ठेव".
त्यावेळी टोळ मुंगीला म्हणाला, "अरे मुंगीताई मी उद्याआणून ठेवीन".
आणि असा दिनक्रम उन्हाळ्यामध्ये दररोज चालू राहिला मुंगी टोळाला म्हणायची जरासे अन्नधान्य साठवून ठेव टोळ मुंगीला म्हणायचा मी उद्या करतो. असा पूर्ण उन्हाळा निघून जातो आणि पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळी टोळ मुंगी कडे धावत धावत जातो आणि मुंगी ताई मुंगीला म्हणतो,
"मुंगी ताई मला जरा थोडे अन्न देना खूप भूक लागली आहे ".
त्यावेळी मुंगी टोळ्याला म्हणते ,
"अरे टोळ दादा तुला मी किती वेळा सांगितले उन्हाळ्यामध्ये की थोडं अन्नधान्य साठवून ठेवू पावसाळ्यामध्ये उपासमार येऊ शकते म्हणून त्यावेळी तू माझा ऐकलं नाहीस दररोज म्हणता उद्या आणतो आणि नाचत नाचत दिवस वाया घालवलेस तुझ्या आळशी पणामुळे आज तुझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मी जर तुला अन्नधान्य दिले तर माझ्यावर देखील उपासमारीची वेळ येऊ शकते मी आजच्या पुरती तुला थोडे देते पण उद्यापासून काही देऊ शकत नाही".
असे मुंगी टोळ्याला म्हटल्यानंतर टोळ्याला आपली चूक लक्षात आली मग त्यांने ज्या दिवशी पाऊस उघडेल त्या दिवशी अन्नधान्य साठवून ठेवू लागला त्याला आपल्या आळशिपणाची चिड येऊ लागली त्यांनी आळस सोडून दिला आणि उन्हाळा आल्यानंतर अन्नधान्य साठवू लागला त्यामुळे टोळ्याची देखील उपासमारी थांबली.
तात्पर्य :- आळस हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे.
लेखक :- यशराज
YouTube channel 👉 click on YouTube
Like Share....
Comments
Post a Comment