Posts

लक्ष्मीपूजन

Image
लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करण्यामागे वेगवेगळी करणे सांगितली जातात.  विजयादशमीला रावणाचा वध करून श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येत पोहोचले. श्रीरामाचा मोठ्या थाटात राज्याभिषेक झाला. तेव्हा अयोध्यावासियांनी आनंदात सर्व नगर आणि शहर दिवे, फुले आणि रांगोळ्यांनी सजवुन उत्सव साजरा केला.  रामरक्षा स्तोत्र पठनाचे महत्व वाचा तेव्हापासून वाईट वृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय म्हणुन दिवाळी साजरी करण्याची पद्धत पडली. रामाने अयोध्येत गेल्यावर, राज्याभिषेक झाल्यावर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. अयोध्येच्या राज्यामध्ये, राज्यकारभारामध्ये गणपतीच्या कृपेने सुबुद्धी यावी आणि लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी यावी यासाठी.  रामाचेच अनुकरण करत सामान्य जणांनी हीच पद्धत पुढे चालु ठेवली.  दिवाळी पासुन व्यापारी वर्ग आपले नवे वर्ष सुरु करतात. नव्या चोपड्यांची (हिशोब आणि कारभाराच्या वह्या) पूजा करून त्यात नव्या वर्षाचे व्यवहार सुरु करतात. तेही गणपतीने ज्ञान आणि सुबुद्धी द्यावी आणि लक्ष्मीने नवीन वर्षात आणखी समृद्धी द्यावी यासाठी अशी पूजा करतात.  हीच पद्धत बाकी वर्गात सुद्धा रूढ झाली.  गणपती हा प्

मुंगी आणि टोळ ( आळशी व कष्टाळू )

Image
मुंगी आणि टोळ ( आळशी व कष्टाळू ) लेखक :- यशराज  मुंगी आणि टोळ ( आळशी व कष्टाळू ) आपण या गोष्टींमध्ये आळशी टोळ आणि कष्टाळू मुंग्यांच्या बद्दल गोष्ट मराठी आहे छान गोष्ट आहे . एका जंगलामध्ये उन्हाळ्यात मुंगी आपल्या वारुळात जंगलामधून छोटे छोटे अन्न घेऊन येत असे व त्याचा साठा करीत असे जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्याला उपासमार येऊ नये म्हणून असे मुंगीचे दररोज अन्नाचे तुकडे घेऊन येणे आणि वारुळात साठवणे चालू होते.  तर तिकडे आळशी टोळ हा गाणे गाईत नाचत असे त्यावेळी मुंगी टोळाला म्हणाली,     "अरे टोळदादा तू आता कशाला नाचत आहेस पावसाळ्यामध्ये उपासमार येऊ शकते त्यामुळे जरा  दररोज थोडं थोडं अन्नधान्य साठवून ठेव".   त्यावेळी टोळ मुंगीला म्हणाला, "अरे  मुंगीताई मी उद्याआणून ठेवीन".  आणि असा दिनक्रम उन्हाळ्यामध्ये दररोज चालू राहिला मुंगी टोळाला म्हणायची जरासे अन्नधान्य साठवून ठेव टोळ मुंगीला म्हणायचा मी उद्या करतो. असा पूर्ण उन्हाळा निघून जातो आणि पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळी टोळ मुंगी कडे धावत धावत जातो आणि मुंगी ताई मुंगीला म्हणतो,     "मुंगी ताई मला जरा थोडे

घोड्याचा खरा मालक कोण ?

Image
घोड्याचा खरा मालक कोण ? अकबर बिरबल घोड्याचा खरा मालक कोण ? अकबर बिरबल  या गोष्टीची व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला.  घोड्याचा खरा मालक कोण ? कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता.  कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.  बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले.  तो म्हणाला “हुजूर, हा घोडा माझा आहे. मी माझ्या गावातुन घोड्यावर बसुन दिल्लीत कामासाठी निघालो होतो. हा माणुस मला रस्त्यात भेटला. तो लंगडत चालत होता. त्याने मला विनंती केली कि मलासुद्धा दिल्लीत यायचे आहे. तुम्हीही तिकडेच जात आहात तर कृपया आपल्या घोड्यावर मला पण घेऊन चला.  आता फारसं अंतर उरलं नव्हतं म्हणुन मी त्याला आपल्या घोड्यावर घेतलं आणि निघालो. पण नंतर हा बदमाश माणुस घोडा माझा आहे आणि तू घोड्याला सोडुन निघ म्हणायला लागला. म्हणुन आमचं भांडण सुरु झालं.”  बिरबलाने दुसया माणसाला विचारले